पूरूष
editमानव प्राण्यातील नर जातीला पुरुष असे म्हणतात. सर्वसाधारपणे प्रौढ (३० किंवा त्याहून अधिक वय) मानव नराला पुरुष असे संबोधले जाते. मुलगा हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील पुरुषांकरीता वापरला जातो. युवक हा शब्द तरुण पुरुषांसाठी वापरला जातो ज्यांचे वय १५ ते २९ दरम्यान असते.
जन्म
editप्रत्येक बाळाचा जन्म हा स्त्री आणि पुरुष बीजाच्या मिलनातून होतो. स्त्री आणि पुरुष बीजांमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांनुसार बाळाचे लिंग ठरते. स्त्री बीजामध्ये केवळ X गुणसूत्र असते तर पुरुष बीजामध्ये X आणि Y हे दोन गुणसूत्र असते.
स्त्री बीजामधील X गुणसूत्र आणि पुरुष बीजामधील Y गुणसूत्र एकत्र आले तर बाळाचे लिंग पुरुषाचे असते व मुलगा जन्माला येतो. तर स्त्री बीजामधील X गुणसूत्र आणि पुरुष बीजामधील X गुणसूत्र एकत्र आले तर बाळाचे लिंग स्त्रीचे असते व मुलगी जन्माला येते. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिकरित्या होते.
ही प्रक्रिया संपूर्ण नैसर्गिक असल्यमुळे बाळाचे लिंग हे पुरुषाचे असेल का स्त्रीचे असेल हे कोणालाच माहीत नसते. म्हणूनच मुलगी जन्माला आली तर स्त्रीचा (आईचा) कोणताच दोष नसतो. व मुलाचा जन्मावर पुरुषाचा (वडीलांचा) कोणताच ताबा नसतो.
पुरुषांचे लौंगिक अंग
editपुरुषांचे लौंगिक अंग हे शरीराच्या बाहेर असते. पुरुषांमध्ये शिश्न आणि वृषण हे दोन मुख्य लौंगिक अंग आहे. वृषण हे शिश्नाला लागुनच असणाऱ्या वृषणकोशात असते. वृषण हे शरीराच्या तापमानापेक्षा कमी तापमानात उत्तम कार्य करते म्हणूनच ते शरीरा बाहेर असते.
शिश्न
editशिश्नाचा उपयोग हा लघवी करण्यासाठी, प्रजनन करण्यासाठी, संभोग किंवा हस्तमैथुन करून लैंगिक सुख मिळवण्यासाठी आणि लैंगिक सुख मिळाल्यानंतर वीर्य व शुक्राणू यांचे मिश्रण बाहेर सोडण्यासाठी होतो.
शिश्न हे दोनपैकी एका अवस्थेत असते ते म्हणजे शीथील किंवा ताठ. शीथील अवस्थेत शिश्न हे बारीक व मऊ असते तर ताठ अवस्थेत शिश्न हे मोठे, कडक व उठलेले असते. ताठ अवस्था ही काहीवेळे पुरतीच असते पण ती कधीही होऊ शकते. लहान बाळांपासून ते म्हाताऱ्या पुरु़षांपर्यंत कोणाचेही शिश्न ताठ होऊ शकते.
शिश्न ताठ होण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे लैंगिक उत्तेजणा असते. लैंगिक विचारांमुळे लैंगिक उत्तेजणा वाढते व त्यामुळे शिश्नामध्ये रक्तसंचाराची गती वाढते आणि शिश्न ताठ होते. पण बऱ्यच वेळा कोणतीही लैंगिक उत्तेजणा नसतानासुध्ध शिश्न ताठ होते. त्यामागचे कारण अजुन समजले नाहीत. उदा. लहान बाळांचे शिश्न ताठ होण्यामागची कारणे अजुन समजू शकली नाहीत. तसेच बऱ्याच पुरुषांचे शिश्न हे झोपेत असताना कधीही ताठ होते, तर अनेक पुरुषांचे शिश्न झोपेतून उठल्यावर ताठ असते. यामागचे कारणसुध्धा अजुन स्पष्ट नाही. यामुळे एखाद्या पुरुषाचे शिश्न ताठ दिसले तर त्यमागे लैंगिक उत्तेजणाच आहे असे नाही म्हणता येणार.
शिश्नाला इतर नावांनी सुध्धा संबोधले जाते. त्यातील काही नावे अशी आहेत - नुन्नी, लंड, लवडा, लिंग, घंटा, केळ, काकडी, तिसरा पाय, ...इत्यादी.
शिश्नांची काही छायाचित्रे
edit-
शीथील शिश्न
-
ताठ शिश्न
-
शीथील आणि ताठ शिश्न
-
शीथील आणि ताठ शिश्न
वृषण
editवृषण हे शिश्नाला लागुनच असणाऱ्या वृषणकोशात असते. वृषणकोशात दोन वृषण असतात जे शुक्राणू व टेस्टोस्टेरॉन यांचे उत्पादन करतात. शुक्राणूंणा 'पुरुष बीज' असेही म्हटले जाते. शुक्राणू शरीरा बाहेर पडताना वाटेत काही ग्रंथींमधुन वीर्य सोडले जाते व असाप्रकारे वीर्य व शुक्राणू यांचे मिश्रण तयार होते. हे मिश्रण चिकट असते आणि ते पांढऱ्या रंगाचे असते. चिकटपणामुळे शुक्राणूंणा त्यांची हालचाल कोणत्याही अडथळ्याविना करता येते. संभोग करतादरम्यान किंवा हस्तमैथुन करतादरम्यान वीर्य व शुक्राणू यांचे मिश्रण शिश्नावाटे शरीरा बाहेर येते. हे मिश्रण जर स्त्रीच्या योनीत पडले तर स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते.
वृषण हे अतिशय नाजुक असते, थोडेशे दबले तरी पुरुषांना खुप वेदना होतात. यामुळे वृषणाला हाताळताना खुप काळजी घ्यावी लागते. बऱ्याचवेळी आपण पाहीलेले असेल की एखादी वस्तु जर वृषणाला जोरात आदळली तर पुरु़ष हा वेदनेने जमीनीवर पडतो व इतर लोक त्यच्यावर हसतात पण खरेतर त्यावेळी त्या पुरुषाला खूप जास्त वेदना होत असतात व बऱ्याचवेळा त्याला चालायला सुध्धा येत नाही. काहीवेळा ती दुखापत इतकी भयानक असते की त्या पुरुषाला दवाखान्यात दाखल करावे लागते. म्हणुनच कधीही तसा अवस्तेत कोणताही पुरुष दिसला तर त्याच्यावर हसू नये, त्याला धीर द्यावा, थोडी विस्रांती घेवू द्यावी व त्याला चालायला आपला आधार द्यावा.
शिश्नाप्रमाणे वृषणाला सुध्धा इतर नावांनी संबोधले जाते. त्यातील काही नावे अशी आहेत - गोट्या, गोटी, अंड, बीजांड, अवघड जागा, नाजुक भाग, ...इत्यादी.
वृषणांची काही छायाचित्रे
editवृषण आणि शिश्न यांना एकत्रीतपणे इतर नावांनी सुध्धा संबोधले जाते. त्यातील काही नावे अशी आहेत :- जननेंद्रिय, गुप्तांग, प्रजनन अंग, ...इत्यादी.
पुरुष शरीराची वाढ
editपुरुष जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची वाढ हळूवारपणे होत राहते. वयात येईपर्यंत त्याच्या शरीराची बरीच वाढ झालेली असते परंतु त्याच्या लौंगिक अंगांची वाढ पूर्ण झालेली नसते. जेव्हा तो वयात येतो तेव्हा त्याच्या शरीराची वाढ ही झपाट्याने होते आणि त्याच्या लौंगिक अंगांची वाढ होऊ लागते. पुरुष हा साधारण ११ ते १५ वर्षांचा झाल्यानंतर वयात येतो. वयात आल्यानंतर त्याच्या शरीराची वाढ ही साधारण २ ते ५ वर्षांत पूर्ण होते. त्यनंतर त्याच्या शरीराची वाढ जास्त होत नाही अथवा पूर्णपणे थांबते.
पुरुष जेव्हा वयात येतो तेव्हा त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचा प्रसार होतो. पुरुषांचे लौंगिक अंग 'वृषण' हे टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन करते. या टेस्टोस्टेरॉनमुळे त्याच्या शरीरात अनेक बदल घडतात. या बदलांमध्ये चेहऱ्यावर मुरुम यायला सुरुवात होते, शरीरावर (उदाहरणार्थ - चेहऱ्यावर, काखेत, छातीवर, लौंगिक अंगांभोवती , इत्यादी.) अनेक ठिकाणी केस यायला सुरुवात होते , शिश्नाचा आकार व लांबी वाढते, वृषणांची वाढ होऊन ते मोठे होतात, आवाजात बदल होतो, असे अनेक बदल पुरुषांमध्ये दिसून येतात. या अवस्थेला पौगंडावस्था असेही म्हटले जाते. पौगंडावस्था पूर्ण झाल्यानंतर पुरुष हा प्रजनन करण्यासाठी पूर्णपणे सक्षम होतो.
पुरुष शरीराच्या बाह्य अवयवांची नावे
editसमोरची बाजू :
मागची बाजू :
चित्रदालन
edit-
उभ्याने लघवी करताना एक पुरुष
-
हस्तमैथुन केल्यावर वीर्य व शुक्राणू यांचे मिश्रण शिश्ना बाहेर येताना.
-
शिश्न ताठ होत असताना