जून ६
दिनांक
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५७ वा किंवा लीप वर्षात १५८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसोळावे शतक
संपादन- १५२३ - गुस्ताफ व्हासाची स्वीडनच्या राजेपदी निवड.
सतरावे शतक
संपादन- १६५४ - स्वीडनची प्रोटेस्टंट राणी क्रिस्टीनाने कॅथोलिक पंथ स्वीकारला व राज्य सोडून दिले. तिच्यानंतर तिचा चुलतभाउ चार्ल्स दहावा राजा झाला.
- १६७४- छ. शिवराय मराठा स्वराज्याचे संस्थापक यांचा राज्याभिषेक (शिवराज्याभिषेक दिन)
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८०९ - स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.
- १८१३ - १८१२ चेयुद्ध - स्टोनी क्रीकची लढाई - जॉन व्हिन्सेन्टच्या नेतृत्वाखाली ७०० ब्रिटिश सैनिकांनी २,००० अमेरिकन सैनिकांचा पराभव केला.
- १८४४ - लंडनमध्ये यंग मेन्स क्रिस्चियन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.)ची स्थापना.
- १८५९ - ऑस्ट्रेलियात क्वीन्सलॅंड प्रांताची रचना.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने मेम्फिस, टेनेसी जिंकले.
- १८८२ - मुंबईत चक्रीवादळ. १,००,०००हून अधिक ठार.
विसावे शतक
संपादन- १९१२ - अलास्कातील नोव्हारुप्टा ज्वालामुखीचा उद्रेक.
- १९१८ - पहिले महायुद्ध - बेलेउ वूडची लढाई.
- १९२५ - वॉल्टर पर्सी क्राइस्लरने क्राइस्लर कॉर्पोरेशनची स्थापना केली.
- १९३३ - अमेरिकेत कॅम्डेन, न्यू जर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थियेटर सुरू.
- १९३४ - अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - डी डे - ऑपरेशन ऑव्हरलॉर्ड या सांकेतिक नावाने ओळखले जाणारी मोहिम सुरू. १,५५,००० दोस्त राष्ट्रांचे सैनिक नॉर्मंडी येथे समुद्रकिनाऱ्यावरून फ्रांसमध्ये घुसले.
- १९६६ - श्यामवर्णीय नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी मिसिसिपीत पदयात्रा करणाऱ्या जेम्स मेरेडिथची हत्या.
- १९६८ - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने रॉबर्ट एफ. केनेडीचा मृत्यू.
- १९७१ - सोवियेत संघाने सोयुझ ११चे प्रक्षेपण केले.
- १९७१ - दुआर्ते, कॅलिफोर्निया गावाजवळ ह्यूज एरवेस्टचे डी.सी.९ व अमेरिकच्या सैन्याचे एफ.४ प्रकारच्या विमानांमध्ये हवेत टक्कर. ५० ठार.
- १९७४ - स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
- १९८१ - भारताच्या बिहार राज्यात सहार्सा शहराजवळ मध्ये बागमती नदीवरील पुलावर रेल्वे गाडी घसरली. अधिकृत २६८ ठार, ३०० गायब. अनधिकृत आकडा - १,००० ठार.
- १९८२ - इस्रायेलने लेबेनॉनवर आक्रमण केले.
- १९८४ - ऑपरेशन ब्ल्यु स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
- १९९३ - मोंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
जन्म
संपादन- १२३६ - वेन तियानशिंग, चीनी पंतप्रधान.
- १५०२ - होआव तिसरा, पोर्तुगालचा राजा.
- १७१४ - होजे पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७७२ - मारिया तेरेसा, ऑस्ट्रियाची सम्राज्ञी.
- १८७२ - अलेक्झांड्रा, रशियाची झारिना.
- १८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
- १९०१ - सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
- १९२९ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
- १९३० - फ्रँक टायसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - आल्बर्ट दुसरा, बेल्जियमचा राजा.
- १९४३ - आसिफ इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - ब्यॉर्न बॉर्ग, स्वीडनचा टेनिस खेळाडू.
- १९५६ - अँडी पायक्रॉफ्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - माईक गॅटिंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - ताहिर नक्काश, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - सुनील जोशी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३९३ - गो-एन्यु, जपानी सम्राट.
- १८६१ - काउंट कॅमियो बेन्सो दि कॅव्हूर, इटलीचा पंतप्रधान.
- १८९१ - सर जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९६१ - कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.
- १९७६ - जीन पॉल गेटी, अमेरिकन उद्योगपती.
- २००२ - शांता शेळके, मराठी कवियत्री.
- २००५ - ऍन बॅन्क्रॉफ्ट, अमेरिकन अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - भारत
- राष्ट्र दिन - स्वीडन.
- क्वीन्सलॅंड दिन - ऑस्ट्रेलिया.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)