अस्थि

(हाडे या पानावरून पुनर्निर्देशित)

अस्थि किंवा हाड हे शरीराच्या सापळ्याचे भाग आहेत. यावर आपले शरीर उभे राहते. जन्मापासून ते वयाच्या तिशिपर्यंत पर्यंत हळूहळू हाडांमध्ये वाढ होत असते. हा सदैव बदलणारा अवयव आहे. हाडात सतत बदल होत असतात. नवीन हाड तयार होत असते. हाडातून पेशी निर्मिती होत असते. हाडे आकार विविध घेऊन एक् जटिल अंतर्गत आणि बाह्य रचना शरीरात बनवली गेली आहे. हाड हे मजबूत आणि तसे हलके असते. साधारण प्रौढ व्यक्तींमध्ये मध्ये २०६ स्वतंत्र हाडे असतात.

पायाची हाडे

प्रकार

संपादन

कटीबंधाचे हाड यास नियमित आकार नसतो. हे बसायला आधार देते. यात पायाची हाडे व मेरुदंड अडकवलेला असतो.

विकार

संपादन

उतारवयात, काही आजारात, आणि चुन्याच्या (कॅल्शियम) अभावामुळे हाड ठिसूळ होऊन मोडते यास अस्थिभंग म्हणतात. स्त्रीयांमधील मासिक पाळी थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. या रोगास ऑस्टीओपोरोसिस म्हणजे अस्थिरोग असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे.[] क्ष किरण तपासणी आणि अस्थिघनता मापन चाचणी याद्वारे आजाराचे निदान करता येते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/38949707.cms[permanent dead link]
  NODES