आयफोन हे ॲपल या कंपनीचे उत्पादन आहे. त्यांचे आयपॉड या लोकप्रिय उत्पादनाचे पुढचे पाऊल म्हणजे फोन व [आयपॉड] यांचे एकत्रीकरण.


काही वैशिष्ट्ये

संपादन
 
आयफोन ३जी
  • स्वतंत्र कळफलक नाही: फोनच्या पडद्याला केलेल्या स्पर्शा द्वारे (टच स्क्रीन) फोनचा कळफलक वापरता येतो.
  • वाय-फाय वापरून जालावर मुशाफिरी : या फोनवरून तुम्ही इमेल वापरू शकता. स्टॉक मार्केट, हवामान आणि युट्युबच्या चलचित्रांबद्दलसुद्धा यावर थेट माहिती मिळू शकते.
  • कॅमेरा: ही आता एक सर्वसामान्य बाब आहे. आजकाल अनेक फोन्स ही सुविधा उपलब्ध आहे. ॲपल आयफोनही त्याला अपवाद नाही. याला २ मेगा पिक्सेल क्षमतेचा कॅमेरा जोडलेला आहे.
  • संगीत: फोन आणि आयपॉड एकत्र करण्याचे काम या कंपनीने केले आहे. यामुळे वेगवेळ्या प्रकारच्या संगीताचे नियोजन आय ट्युन्स मार्फत करता येते.
  • नकाशे: ही सुविधा आपल्याला गुगल मॅप देऊ करते.

भारतात ॲपल आयफोन वोडाफोनएरटेल मार्फत विकला जात आहे.

आयफोनची नवीन २.१ प्रणाली टाकली असता मराठी वाचता येते. यामध्ये मोबाईल सफारी हे बाऊझर युनिकोड रेंडरींग करू शकतो.

मात्र हे युनिकोड रेंडरींग व्यवस्थितपणे येत नाही. चर्चा असेल तर 'च् र्चा ' असे काही तरी दिसते. अजून सुधारणा आवश्यक आहेत.

फोनची माहिती

संपादन
  • स्क्रीन:३.५ इंची स्क्रीन १६० पीपीआय(पिक्सेल्स् प्रती इंचवर्ग )
  • बॅटरी कपॅसिटी: (एकदा चार्ज केल्यावर) ६ तास इंटरनेट वापराकरिता, ७ तास चलचित्र पाहण्यासाठी, २४ तास गाणी ऐकण्यासाठी व २५० तास स्टॅंड बाय वेळ.
  • ऑपरेटींग सिस्टीम: मॅकिन्तोश एक्स.
  • रेडिओ ट्रांसमीटर्सची सोयः ब्ल्यूटूथ,वाय-फाय व सेल्युलर(जीएसएम व इडिजीई अथवा एज)
  • जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक.

आयफोन अनेक खेळ आहेत. यातले काही मोफत तर काही पैसे देऊन विकत घेता येतात. त्यासाठी आयट्यून्स वर खाते असणे आवश्यक असते.

बाह्य दुवे

संपादन
  NODES