इलिनॉय (इंग्लिश: Illinois) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले इलिनॉय हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेत पाचव्या क्रमांकावर असून देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर शिकागो ह्याच राज्यात आहे. राज्याच्या एकूण १.२८ कोटी लोकसंख्येच्या ६५ टक्के रहिवासी शिकागो महानगर परिसरात वास्तव्यास आहेत. राज्यातील शिकागो वगळता जवळजवळ इतर सर्व भाग ग्रामीण वा अर्ध-शहरी स्वरूपाचा आहे.

इलिनॉय
Illinois
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: लॅंड ऑफ लिंकन (Land of Lincoln)
ब्रीदवाक्य: State sovereignty, national union
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी स्प्रिंगफील्ड
मोठे शहर शिकागो
क्षेत्रफळ  अमेरिकेत २५वा क्रमांक
 - एकूण १,४९,९९८ किमी² 
  - रुंदी ३४० किमी 
  - लांबी ६२९ किमी 
 - % पाणी ०.७१
लोकसंख्या  अमेरिकेत ५वा क्रमांक
 - एकूण १,२८,३०,६३२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ८६.२७/किमी² (अमेरिकेत १२वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $५४,१२७
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ३ डिसेंबर १८१८ (२१वा क्रमांक)
संक्षेप   US-IL
संकेतस्थळ www.illinois.gov

इलिनॉयच्या उत्तरेला विस्कॉन्सिन, ईशान्येला मिशिगन सरोवर, पूर्वेला इंडियाना, आग्नेयेला व दक्षिणेला केंटकी, तर पश्चिमेला आयोवामिसूरी ही राज्ये आहेत. स्प्रिंगफील्ड ही इलिनॉयची राजधानी आहे.

अमेरिकेच्या राजकीय पटलावर इलिनॉयला विशेष महत्त्व आहे. अब्राहम लिंकन, युलिसिस एस. ग्रँटबराक ओबामा हे तीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इलिनॉयचे राज्यातून निवडून आले आहेत तर रोनाल्ड रेगन ह्यांचा जन्म ह्याच राज्यात झाला.

गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  NODES
os 3