एरब्लू लिमिटेड (एरब्लू या नावाने परिचित) ही पाकिस्तानमधील खाजगी विमान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय इस्लामाबाद स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स मध्ये १२ व्या मजल्यावर आहे.[] इस्लामाबाद, लाहोर, कराची आणि पेशावर या स्थानकांपासून दैनंदिन ३० विमानांची सेवा दुबई, अबूधाबी,शारजॉं, आणि मस्कत या आंतरराष्ट्रीय स्थानकांपर्यंत उपलब्ध आहे. विमानांचे विश्रांतीस्थळ जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ, कराची येथे आहे.

एरब्लयू कंपनीचे मुख्यालय पाकिस्तानमधील इस्लामाबाद

इतिहास

संपादन

या कंपनीची स्थापना २००३ मध्ये होउन १८ जून, इ.स. २००४ रोजी भाडयाने घेतलेल्या एरबस ए३२०-२०० विमानांच्या सहाय्याने दिवसातून तीनदा कराची ते लाहोर आणि कराची ते इस्लामाबाद अशी दैनंदिन सेवा सुरू करण्यात आली.[] त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान जाफरूल्लाह खान जमाल यांचे हस्ते या विमान सेवेचे उद्‌घाटन झाले.

पहिल्याच वर्षी या विमान कंपनीला बरीच प्रसिद्धी मिळाली.[] या वर्षी ४,००,००० प्रवाशांनी या कंपनीच्या विमानांतून प्रवास केला. एरब्ल्यू पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानकंपनी व इतर दोन खाजगी स्थानिक विमान कंपन्यांना रांगेत उभी राहिली.[] त्यामुळे या कंपनीने पाकिस्तानमधील पेशावर, क्वेट्टा आणि नवाबशाह या इतर शहरांमध्ये सुद्धा विमानप्रवासाची सुरुवात केली.[]

१४ ऑगस्ट २००५ या पाकिस्तानच्या ५८ व्या स्वातंत्रयदिनी एरब्ल्यूने कराची ते दुबईपर्यंतच्या पहिल्या आंरतराष्ट्रीय उड्डाणास सुरुवात केली. ४ जून २००७ रोजी एरब्ल्यूचे एरबस ए-३२१ विमान मॅंचेस्टर पर्यंत खेपा करायला लागले. यापुढे २०१४ मध्ये लाहोर ते लंडन सेवा पुरविण्याचा बेत आहे.[]

स्थानके

संपादन

डिसेंबर २०१५पर्यंत या विमान सेवेची आगमन ठिकाणे खालीलप्रमाणे होती.[][]

देश शहर विमानतळ संदर्भ
ओमान मस्कत मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान फैसलाबाद फैसलाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान ग्वादार ग्वादार आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान इस्लामाबाद बेनझीर भुत्तो आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान कराची जींना आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान लाहोर अल्लमा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान मुलतान मुलतान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान नवाबशाह नवाबशाह विमानतळ
पाकिस्तान पेशावर बच्चा खान आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान क्वेट्टा क्वेट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान रहीम यार खान शैख झैद आंतरराष्ट्रीय विमानतळ
पाकिस्तान सियालकोट सियालकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया दम्माम किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया जेद्दाह किंग अब्दुल्लाहजिज आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया मेदिना प्रिन्स मोहम्मद बिन अब्दुलहजिज विमानतळ
सौदी अरेबिया रियाद किंग खलीद आंतरराष्ट्रीय विमानतळ
तुर्कस्तान इस्तंबूल शाबिहा गोकीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड अरब एमिरेटस अबु धाबी अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड अरब एमिरेटस दुबई दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड अरब एमिरेटस शारजाह शारजाह आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड किंग्डम बर्मिंघम बर्मिंघम आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड किंग्डम मॅंचेस्टर मॅंचेस्टर विमानतळ

भविष्यातील बेत

संपादन

युरोप, चीन आणि मध्य पूर्व या ठिकाणांपर्यंत सेवा वाढवून युरोपमध्ये स्वतःचे स्थान प्रस्थापित करण्याचा एरब्ल्यूचा मानस आहे.[] मुंबई – कराची पर्यंतचा मार्ग सुद्धा चालु करण्याची योजना आहे. या साठी पाकिस्तान एरलाईन्सप्रमाणे (पीएलए) या कंपनीची पुर्नरचना करणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील नागरी वाहतूक करारानुसार , सध्या पीएलएकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये आठवडयातून १२ उड्डाणे केली जात आहेत.

केबिन

संपादन

एरबस ए३२० आणि ए३१९ ही दोन्ही विमाने सध्या वापरात आहेत. सर्व एरक्राफट एकॉनॉमी वर्गाची असून व्हिडीओ स्क्रीनची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

ई-तिकेटींग

संपादन

ई-तिकेटींग, वायरलेस चेक – ईन आणि सेल्फ चेक इन किआस्क सुविधा प्रथमच या ‍कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत. साबरे ही तिकिट वाटप पद्धतसुद्धा प्रथमच चालू केलेली आहे.

उड्डाणाचा कार्यक्रम

संपादन

ब्लयू माईल्स या नावाने ओळखला जाणारा एरब्ल्यूचा हा कधीतरी होणारा उड्डाणाचा कार्यक्रम आहे.[]

विश्रांतीस्थळ

संपादन

नोव्हेंबर २००८ मध्ये कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर या कंपनीचा स्वतःच्या प्रिमिअम विश्रांतीस्थळाचे उद्घाटन झालेले आहे. व्यापारी , क्रेडीट कार्ड धारक आणि अतिशय ठराविक ग्राहकांसाठी विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलजवळ ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. इंटरनेट सुविधा, केबल दूरचित्रवाणी, वर्तमानपत्र आणि मासिके, मसाज खूर्ची आणि खादयपदार्थ इ.चा समावेश यामध्ये आहे.

दर कमी करण्यासाठी उपाय

संपादन

जागतिक स्तरावरील इंधनाचे दर वाढल्यामुळे एरब्लयूने सर्व विमाने इकॉनॉमी वर्गामध्ये रूपांतरीत केलेली आहेत. तसेच विमानामध्ये उपलब्ध करून दिले जाणारे पूर्ण जेवणसुद्धा बंद करण्यात आले व त्याऐवजी हलकासा नाष्टा ठेवण्यात आलेला आहे.[१०]

मालवाहतूक

संपादन

एर ब्लूने पाकिस्तानचे एर फ्राइट मार्केट, युनायटेड अरब एमिरेटस, युनायटेड किंग्डम येथे ई-कार्गो अन्नपुरवठा सेवा चालू केली आहे.[११]

इतर सेवा

संपादन

प्रवासी विमान सुटण्याच्या ४८ तास आधी किंवा दोनतास आधीसुद्धा विमानतळावर प्रवेश करण्याची संधी दिली जाते.

कारगो ऑपरेशन

संपादन

पाकिस्तान, यु.ए.ई. आणि यु.के.च्या विमानांमधून ई-कार्गो सेवा उपलबध करून दिलेली आहे.[१२]

उड्डाण

संपादन
एरक्राफट उड्डाण मागणी नोट्स
एरबस ए३२०-२००
एकूण

दुर्घटना आणि अपघात

संपादन

२ ८ जुलै, २०१० रोजी एरब्लयू एरबस ए३२१ च्या विमानाला इस्लामाबाद मध्ये बेनझिर भुत्तेा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मरगाला टेकडयांमध्ये कोसळल्यामुळे आणि कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटलेले विमान विमानचालकाच्या चुकीमुळे अपघातग्रस्त झाले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "आम्हाला संपर्क करा" (इंग्लिश भाषेत). 2010-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b स्मिझ २००६ पा. ५७.
  3. ^ "पाकिस्तानची सर्वांत प्रसिद्ध खाजगी विमानवाहतूक कंपनीच्या विमानाचे मे मध्ये यु.के.पर्यंत उड्डाण" , पाकिस्तान टाईम्स, जान २ ८, २००७
  4. ^ स्मिझ २००६ पा.५८..
  5. ^ "यापुढे दोन वेगवेगळया मार्गांवर प्रवास सुरू" (इंग्लिश भाषेत). 2014-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "एरब्ल्यू शेडयुल" (इंग्लिश भाषेत). 2013-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "एर ब्लू एरलाइन्स घेत असलेला विमानतळ". 2021-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-05-31 रोजी पाहिले.
  8. ^ "उड्डाणे दोनदा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "एरब्लयू" (इंग्लिश भाषेत). 2014-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "एरब्ल्यू ए३२० च्या एकॉनॉमी वर्गाबाबत" (इंग्लिश भाषेत). 2012-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "ई-कार्गो ची सेवा".
  12. ^ "एरब्ल्यू ई कार्गो" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  NODES