कोआविला
कोआविला (संपूर्ण नाव: कोआविलाचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Coahuila) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस अमेरिकेचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. रियो ग्रांदे ही उत्तर अमेरिकेमधील एक प्रमुख नदी कोआविलाला टेक्सासपासून वेगळे करते. कोआविला क्षेत्रफळानुसार मेक्सिको देशामधील तिसऱ्या तर लोकसंख्येनुसार १५व्या क्रमांकाचे राज्य आहे. साल्तियो ही कोआव्हिला राज्याची राजधानी तर तोरेओन हे सर्वात मोठे शहर आहे.
कोआविला Coahuila | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
कोआविलाचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | साल्तियो | ||
क्षेत्रफळ | १,५१,५६३ चौ. किमी (५८,५१९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २७,९८,०६४ | ||
घनता | १८ /चौ. किमी (४७ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-COA | ||
संकेतस्थळ | http://www.coahuila.gob.mx |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |