झोप ही शरीराची पुनुरावर्ती अवस्था. या अवस्थेमध्ये बाह्य जाणीवा कमी होतात. ज्ञानेंद्रियाकडून आलेले संवेद मेंदूकडे पूर्णपणे नेले जात नाहीत. ऐच्छिक स्नायूंचे कार्य शिथिल होते. झोपेमध्ये जागृतावस्थेमधील शरीराची प्रतिक्रिया कमी होते. चेताकडून आलेल्या उत्तेजनाना प्रतिसाद मिळत नाही. ही अवस्था परिवर्तनीय आहे. १९५० पर्यंत झोप शरीराच्या दररोजच्या चक्राचा निष्क्रीय भाग आहे अशी समजूत होती. पण आता झोप शरीराच्या आणि मनाच्या अनेक बाबींशी संबंधित आहे हे समजले आहे. चेताउद्भवी रसायने चेतामधून स्त्रवत असतात. मेंदू आणि मज्जारज्जू याना जोडणा-या मस्तिष्कस्तंभ चेतापेशीमधून सिरोटोनिन आणि नॉर इपिनेफ्रिन नावाची दोन रसायने स्त्रवतात. नॉरइपिनेफ्रिन मेंदूमधील बहुतेक भाग आपण जागे असता कार्यक्षम ठेवते. मस्तिष्कस्तंभाच्या तळाशी असलेल्या काहीं पेशीनी पाठविलेल्या संवेदामुळे झोप येण्यास प्रारंभ होतो. जागृत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या चेतापेशींचे कार्य तात्पुरते थांबते. अशा वेळी जागे राहणे अशक्य होते. या वेळी रक्तामध्ये अडिनोसिनचे प्रमाण वाढते झोप यायला लागली आहे असे आपण अशा वेळी म्हणतो. झोपेत असताना अडिनोसिनचे विघटन होते.

झोप

झोपेच्या अवस्था

संपादन

झोपेत असताना आपण झोपेच्या पाच अवस्थेमधून जातो. अवस्था १, २, ३, ४ आणि रेम झोप . रेम झोप म्हणजे रॅपिड आय मूव्ह्मेंट. झोपताना आपण बहुघा झोपेच्या एक पासून पाचव्या स्थितीपर्यंत जातो. त्यानंतर झोपेचे दुसरे चक्र पहिल्यापासून चालू होते. दुसऱ्या झोपेची अवस्था पन्नास टक्के एवढा वेळ असते. वीस टक्के रेम झोपेमध्ये आणि तीस टक्के इतर स्थितीमध्ये. तुलनेने नुकतीच जन्मलेल्या बालकामधील पन्नास टक्के वेळ रेम झोपेमध्ये जातो.

झोपेच्या पहिल्या स्थितीमधून आपल्याला सहज बाहेर येता येते. ही अवस्था पेंगुळलेली असते. डोळे जड झालेले असतात. स्नायू शिथिल झालेले असतात. झोपेच्या पहिल्या अवस्थेतून जागे झालेल्या व्यक्तीना झोपेपूर्वीची काहीं प्रसंग विस्कळित असे आठवतात. पहिल्या अवस्थेमधील झोपेमध्ये आपण दचकून पडल्याची भावना ब-याच जणाना होते. पहिल्या अवस्थेमधून झोपेच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर डोळ्यांची हालचाल थांबते. मेंदूचा आलेख स्थिर असतो. झोपेच्यातिस-या अवस्थेमध्ये मेंदू आलेखामध्ये डेल्टा लहरी दिसू लागतात. चवथ्या अवस्थेमध्ये सतत डेल्टा लहरी दिसतात. झोपेच्या चवथ्या अवस्थेमधून व्यक्ती लवकर जागे होत नाही. या अवस्थेमध्ये लहान मुलामध्ये अंथरूण ओले करणे, झोपेमध्ये चालणे, घाबरून उठणे असे प्रकार घडतात.झोप ही आपल्या शरीरासाठी खुप महत्त्वाची आहे. झोप ही ७ तास घ्यावी. झोप लागल्यानंतर सत्तर ते नव्वद मिनिटानी रेम झोप चालू होते. या झोपेमध्ये श्वास जलद, अनियमित आणि अपूर्ण असतो.डोळे सर्व दिशेला भराभरा फिरतात. अवयवांचे स्नायू शिथिल झालेले असतात. हृदयाची गति आणि रक्तदाब वाढतो. पुरुषामध्ये लिंग ताठ होते. रेम झोपेमधून जागे केले असता ब-याच व्यक्ती असंबद्ध बोलतात. या झोपेच्या अवस्थेमध्ये स्वप्ने पडतात. झोपेचे पूर्ण चक्र सरासरी 90-110 मिनिटांचे असते. झोप चक्राच्या शेवटी रेम झोप आणि परत झोपेचे पुढील चक्र चालू होते. पहाटे लागणारी झोप 1-2 आणि रेम झोपेची असते.

परिणाम

संपादन

झोपणे आणि जागे होणे या दोन्ही क्रिया चेताउद्भवी रसायनामुळे घडत असल्याने आहार, औषधे यामुळे झोपेवर परिणाम होतो. कॉफी, नाक मोकळे ठेवण्यासाठी घेतलेली नाकात घालण्याची औषधे यामुळे झोप लागत नाही. ब-याच ताण कमी करणाऱ्या औषधामुळे रेम झोपेवर परिणाम होतो.रेम झोपेचा कालावधि कमी होतो. अति धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये झोप अत्यंत कमी असते त्यांच्या रेम झोपेची वेळ सुद्धा कमी असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची तीन ते चार तासानी झोपमोड होते. निद्रानाश झालेल्या व्यक्ती झोप येण्यासाठी मद्यपान करतात. मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमधील झोप पहिल्याआणि दुसऱ्या अवस्थेतील असते. त्यांच्या रेम झोपेचा कालावधि कमी होतो. त्याना सहज झोपेमधून जागे करता येते. झोप न येण्याच्या आजारास निद्रानाश असे म्हणतात. रेम झोपेमध्ये शरीराचे तपमान नियंत्रित करण्याची यंत्रणा क्षीण होते. अत्यंत थंडी किंवा उष्ण तपमानात झोप विस्कळित होते. भूल दिलेल्या व्यक्ती आपल्याला झोप लागली होती असे सांगतात. पण त्याना अशा झोपेमधून उठवता येत नाही. भूल दिल्यानंतर त्यांच्या मेंदू आलेखामधील जागे पणीच्या लहरी दिसत नाहीत. भूल दिलेल्या व्यक्तीमधील मेंदूआलेखामधील सर्वच लहरी क्षीण होतात. अनेक प्राण्याच्या झोपेचा अभ्यास झालेला आहे. माणसाला ६ ते ८ तासांच्या सलग झोपेची आवश्यकता असत़े मात्र त्यातही व्यक्तिसापेक्षता असत़े काहींना ६ तासांचीच झोप खूप वाटते, तर काहींना ८-१० तासांची झोपसुद्धा अपुरी वाटत़े त्यामुळे ज्या सलग झोपेनंतर माणसाला उरलेले सर्व तास काम करण्याचा उत्साह राहतो आणि डोळ्यांवर झापड येत नाही़ मधुमेह, चिंता, ह्रदयविकार, तणाव, आम्लपित्त, अर्धागवायू, उच्च रक्तदाब, स्मृतिभ्रंश अशा एकना अनेक शारीरिक- मानसिक व्याधींना कमी झोप किंवा निद्राविकार होतात.

प्राणी

संपादन

सर्व पृष्ठवंशी प्राणी कमी अधिक काळ झोपतात. मासे एका वेळी फक्त दहा ते पंधरा सेकंद झोपतात. सरडा, साप, पक्षी आणि सस्तन प्राणी तुलनेने अधिक काळ झोपतात. झोपेचे आणि जागे राहण्याचे चक्र जैविक लयबद्धतेशी निगडित असते. घोडा उभ्याने थोडा थोडा वेळ झोपतो. कुत्रा, लांडगा, सिंह, वाघ असे शिकारी प्राणी अधिक वेळ; तर हरणे ससे यासारखे प्राणी कमी वेळ झोपतात. साप आणि मासे यांच्या डोळ्यावर पापण्या नसतात ते डोळे उघडे ठेवून झोपतात. निशाचर प्राणी दिवसा तर दिनसंचारी प्राणी रात्री झोपतात.

वामकुक्षी

संपादन

दुपारच्या जेवणानंतर डाव्याकुशीवर डुलकी काढण्याला वामकुक्षी असे म्हणतात. यामुले परत तरतरीत व्यायला मदत होते. ती फार फार तर १५ ते २० मिनिटांची असावी असे मानले जाते.

जागे करणे

संपादन

रोगी, प्रवासी, कार्यार्थी, विद्यार्थी, स्वहितार्थीच |
पंचैते जागरणमर्हन्ति विना दोषेण पुरुषः |
[ संदर्भ हवा ]

अर्थः रोगी व्यक्तीस औषध घेण्यासाठी,प्रवासात प्रवाश्याचे स्थानक आल्यावर,ज्यास काही काम करावयाचे आहे ,ज्यास विद्या ग्रहण करावयाची आहे व असा जो कोणी ज्यास (काही) हित साधावयाचे आहे अश्यांना झोपेतून उठविल्यास त्याचा दोष लागत नाही.

तसेच, 'झोपी गेलेल्यास जागे करता येथे पण, झोपेचे सोंग घेतलेल्यास जागे करता येत नाही' असेही म्हणतात.

बाह्य दुवे

संपादन

छुपके से आजा रें अखियन् में...[मृत दुवा]

  NODES
os 1