तथागत
तथागत हा पाली आणि संस्कृत शब्द असून, गौतम बुद्ध पाली वाड्मयानुसार स्वतःचा संदर्भ देताना हा शब्द वापरत असे. या संज्ञेचा असा अर्थ तथा + गत = "जसा आला तसा गेला" किंवा तथा +आगत = "तथ्य घेऊन आला" असे मानवी शुद्ध स्वरूप असावे या अर्थी असावा. परंतु "तथागत" ही संज्ञा आला-गेला पुरती मर्यादित नाही तर ती अधिक गहन व मोठ्या अर्थाने आहे. मराठी भाषेत तथागत या शब्दाचा "सद्गती मिळालेला" श्रेष्ठ, पूज्य, "अधिका अधिक त्याग केलेला" असा आहे. [१] तरीही या शब्दाचा अर्थ अद्याप अनिश्चित आहे.[२] बौद्ध साहित्यात गौतम बुद्धांनी मी किंवा माझ्या संबंधी या ऐवजी तथागत शब्दाने अनेकदा अधोरेखित केले आहे.याचा अर्थ असा होतो की मानवी समाजात त्या धर्माच्या शिक्षणातून व साहित्यातून उमजलेली व्याख्या गृहीत धरली जाते.तथागत या शब्दाचे काही अर्थ आहेत, परंतु अनुयायी आणि एक बौद्ध धर्मप्रचारक जो "येतो आणि त्याच प्रकारे जातो" हा सर्वसामान्य अर्थ समजतात.[३]
तथागत हा पाली भाषेतील शब्द आहे, याचा अर्थ 'यथाचारी' किंवा 'तथाभाषी' असा होतो. म्हणजेच, ज्या प्रमाणे बोलतो त्या प्रमाणे कृती करतो.
भगवान बुद्ध हे मानवी बुद्धीच्या अवाक्या बाहेरचे कधीच बोलत नसत. तथागत जे जे बोलत असत ते स्वतःच्या आचरणाने प्रमाणित करीत असत. आणि जे आचरणाने प्रमाणित करीत असत, तेच बोलत असत. म्हणूनच, भगवान बुद्धांना 'तथागत' या नामाभिदानाने संबोधले जाते.[४]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ |मराठी शब्दकोश
- ^ Chalmers, Robert. The Journal of the Royal Asiatic Society, 1898. pp.103-115
- ^ Tathāgata तथागत. tathAgata. (accessed: January 19, 2016)
- ^ संदर्भ : Intelligent Man's Guide to Buddhism. लेखक : भदंत आनंद कौसल्यायन