नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांच्या साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो.त्याद्वारे जमीन नीट उखरली जाते. आधुनिक काळात नांगरणी ही ट्रॅक्टरद्वारे केली जाते.ट्रॅक्टर आल्यापासून नांगर नाहीसे झाले.

लाकडी नांगर
        नांगराचे सुटे भाग
  1  ईसाड  :  दहा फूट लांब  लाकडी पट्टी 
  2  रूंगणी :  नांगराची मूठ
  3  खूट  :   यालाच  फाळ  बसवतात 
  4  कवळी :  ईसाडाला  खूट व रूंगणी  कवळीमुळे घट्ट  बसते.
  5  जोखड  : दोन बैल  याला  जूंपतात
  NODES