निबंध

गद्य लेखन प्रकार

निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे.[] निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." नि+बन्ध = बांधणे "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.[] निबंध हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.

* निबंध विषयक माहिती शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना पहाण्यासाठी 'विस्तार' शब्दावर क्लिक करावे
कॉंप्यूटरवर मराठीत लिहिता येणे हिच खरी साक्षरता ! मराठी मित्रांनो, मराठीत लिहिण्यास शिका !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती
'
  • विद्यार्थ्यांना सूचना : निबंधासाठी माहिती शोधण्यासाठी आधी मराठीत शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून मराठी टायपिंग कसे करावयाचे त्याची माहिती घेतली पाहिजे. उजवीकडे व्हीडिओ क्लिपेत दाखवल्याप्रमाणे मराठी टायपिंगची माहिती घ्या आणि मग मराठीतून माहिती शोधा.
  • या विद्यार्थीप्रिय लेखात निबंधाबद्दल ज्ञानकोशीय माहिती आहे (थोडक्यात निबंध म्हणजे काय ? कसा असतो त्याचे प्रकार, घटक इत्यादी). निबंधांबद्दल ज्ञानकोशीय माहिती घेतल्यानंतर; इच्छुक वाचक विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिबुक्स या बंधुप्रकल्पात निबंधलेखन कसे करावे ? हा मार्गदर्शनपर लेख उपलब्ध आहे.

निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. रावसाहेब गणपतराव जाधव यांच्या मराठी विश्वकोशातील मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".[] यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोनांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.

निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना ज्येष्ठ समीक्षक मो.रा.वाळंबे म्हणतात 'निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे." निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची. एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार निबंधामुळे एकत्रित होतात.'

उपयोजन

संपादन

निबंधातून अनेक विषय हाताळले जाताना दिसतात. उदा० साहित्यिक टीका, राजकीय जाहीरनामे, अभ्यासपूर्ण तर्क, दैनंदिन जीवनातील निरीक्षणे, लेखकांचे चिंतन आणि आठवणी.

निबंधाची व्याख्या जराशी अस्पष्ट असते. बऱ्याचदा निबंधाचे लेख आणि लघुकथा लेखन शैलीशी साधर्म्य दिसून येते [ संदर्भ हवा ]. आधुनिक काळातील जवळपास सर्व निबंध गद्यस्वरूपाचे असतात परंतु क्वचित काही पद्यलेखांचेही वर्गीकरण निबंध या प्रकारात केले जाताना दिसून येते (उदाहरणार्थ अलेक्झांडर पोप'चे An Essay on Criticism आणि An Essay on Man). संक्षीप्तता आणि नेमकेपणा हे निबंधाचे महत्त्वाचे गुण असले तरीही, जॉन लॉक (John Locke)'चे An Essay Concerning Human Understanding आणि थॉमस माल्थस'चे An Essay on the Principle of Population ही अतिदीर्घ लेखनेही निबंध प्रकारात दिसून येतात. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भाषिक आणि लेखन कौशल्य विकास तसेच एखाद्या विषयाचा अभ्यास आणि आकलन समजून घेण्याच्या दृष्टीने, निबंधलेखनाचे कौशल्य अवगत करवून घेण्यास महत्त्व दिले जाते. यासाठी बहुधा आराखड्याचा सराव करून घेण्याचे स्वरूप वापरले जाताना दिसते. विद्यापीठांतून विशेषतः मानव्य आणि समाजशास्त्र शाखांतून बऱ्याचदा प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून तर; शासकीय, सामाजिक आणि खासगी आस्थापनातून उमेदवार निवडीच्या स्तरावर निबंध लिहून घेतले जातात.

निबंधरचना तंत्र आणि मंत्र या मार्गदर्शक ग्रंथाच्या लेखिका सुलभा प्रभुणे यांच्या मतानुसार निबंध लेखनाच्या सरावामुळे मुद्देसूद मांडणीचे वळण पडते जे भावी आयुष्यातील, जाहिरात, दूरदर्शन, वृत्तपत्रे इत्यादी विविध वृत्तमाध्यमे, संगणक सादरीकरणे अशा कार्यक्षेत्रात प्रभावी ठरू शकते.[]

कलाक्षेत्रात संकल्पना अथवा विषयांच्या निबंधस्वरूप मांडणीसाठी लेखनापलीकडे जाऊन चित्र, छायाचित्रे, ध्वनी, संगीत, वृत्तचित्र (डॉक्युमेंटरी), अनुबोधपट, ही माध्यमेही वापरली जातात.

व्याख्या

संपादन

निबंधाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. एक व्याख्या अशी आहे की, " चर्चित विषयाबद्दल लक्ष्यकेंद्रित गद्य रचना " किंवा " पद्धतीशीर दीर्घ प्रपाठ "[]

एखादा निबंध नेमक्या कोणत्या साहित्यप्रकारात मोडेल हे सांगणे काही वेळा कठीण असू शकेल. निबंधकार ऑल्डस हक्स्ली, यांच्या मतानुसार "निबंध हे अगदी कादंबरी प्रमाणेच एक साहित्यिक साधन आहे.[] ह्यात बहुधा कोणत्याही विषयावर सर्व काही लिहिण्याची मुभा असते. निबंध लेखन हे परंपरेने आणि व्याख्येनेही लेखनाचा एक छोटा तुकडा असतो त्यामुळे एकच निबंध सर्वसमावेशक बनवता येईल हे जरासे अवघडच असते." ऑल्डस हक्स्ली पुढे लक्ष वेधतो, "परंतु निबंधांचा संग्रह केला तर दीर्घ कादंबरी प्रमाणेच विषयाचा सखोल ऊहापोह व्यापक परीघातही केला जाऊ शकतो." - मॉन्टेनचे तिसरे पुस्तक हे त्याचे उदाहरण असल्याचे हक्स्ले म्हणतो. हक्स्लेच्या मतानुसार निबंध या साहित्य प्रकाराचे वैविध्य समजण्यासाठी त्याचा ३ स्तरांमध्ये विचार करता येईल.[]

हे तीन स्तर खालीलप्रामाणे :

  • व्यक्तिचित्रण अथवा आत्मचरित्रात्मक निबंध लेखन: यामध्ये प्रामुख्याने आत्मचरित्रात्मक/अनुभवपर लिखाण असते. अशा निबंधांमध्ये अनुभव कथनातून आजूबाजूच्या गोष्टींवर भाष्य केलेले असते.
  • वास्तव आणि वस्तुनिष्ठ: या स्तरावर, लेखक "स्वतःबद्दल न लिहिता, विज्ञान, साहित्य, राजकारण अशा विषयांवर लिहितात.".
  • अमूर्त-वैश्विक : या स्तरावर लेखक अत्यंत अमूर्त संकल्पनांबद्दल लिहितात. असे निबंध त्रयस्थपणे लिहिले जातात आणि त्यात क्वचितच वस्तुस्थितीतील किंवा अनुभवात्मक उदाहरणे असतात.

हक्स्लीच्या मते जे निबंध या तीनही स्तरांचा सर्वोत्तम उपयोग करून घेतात तेच सर्वाधिक समृद्ध ठरतात.

 
Michel de Montaigneचे निबंध

व्युत्पत्ती

संपादन

इंग्रजी essay या शब्दाचा उगम फ्रेंच भाषेतील essayer (प्रयत्न करणे) या शब्दापासून झाला. फ्रेंच लेखक मिशेल द मॉण्टेन याने स्वतःचे विचार कागदावर उतरवण्याचा प्रयत्न या अर्थाने त्याच्या लिखाणासाठी सर्वप्रथम essay हा शब्द वापरला. इंग्रजीतील essay या शब्दाचाच पर्यायशब्द ‘निबंध’ हा आहे. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंधनामक ग्रंथ उपलब्ध आहेत. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांमध्ये एखाद्या ग्रंथाची टीका, भाष्य या स्वरूपात नसलेल्या व स्वतंत्र रीतीने लिहिलेल्या पुस्तकास संस्कृतमध्ये ‘निबंध’ ही संज्ञा आहे. पण मराठीमध्ये निबंधाचा जो अधिकृतबंध रूढ झालेला आहे, त्याचे स्वरूप संस्कृतमधील निबंधाचे नाही. त्याचे स्वरूप हे इंग्रजीमधील ‘essay’ या गद्यप्रकाराचे आहे. इंग्रजी वैचारिक वाड्‌मयातील निबंध हा आधुनिक मराठी सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये आणला आणि अनेक विद्यांच्या शाखोपशाखांनी तो समृद्ध होत गेला[].  

इतिहास

संपादन

रावसाहेब गणपतराव जाधव यांच्या मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, संस्कृतात निबंध ही संज्ञा असली तरी, आधुनिक अर्थाने जी निबंधरचना अभिप्रेत आहे ती संस्कृतात नाही.[] धर्मनिबंधांसारख्या बहुतांशी गद्यप्रकारांतील लेखनात हिंदू लोकांना आचार, व्यवहार, प्रायश्चित्ते इत्यादींसंबंधी मार्गदर्शन करणारे विवेचन केलेले आढळते. स्मृतिग्रंथांवरील टीका हासुद्धा निबंधलेखनाचाच एक प्रकार म्हणता येईल.[]

आधुनिक निबंधसाहित्य हे गद्यातच असते. तथापि गद्यसाहित्याचा उदय होण्यापूर्वी सगळेच लेखन पद्यातून होत असे. आपल्याकडे महाभारतातील राजधर्मासारखे (शांतिपर्व) प्रकरण हे पद्यातील निबंधसाहित्य म्हणता येईल.[] रामदासांनी लिहिलेली काही प्रकरणे - उदा., राजधर्म, सेवकधर्म - यांचे स्वरूप स्थूलमानाने निबंधवजाच म्हणता येईल.[] इंग्रजीत अठराव्या शतकात अलेक्झांडर पोप या कवीने ‘अ‍ॅन एसे ऑन क्रिटिसिझम’ व ‘अ‍ॅन एसे ऑन मॅन’ या नावांच्या कविताच लिहिलेल्या आहेत व त्यांत विचारप्रर्वतनालाच महत्त्व आहे.[] गद्य आणि पद्य ही माध्यमे निबंधाच्या हेतूशी संवादी असली, तरी प्रत्यक्षात मात्र निबंध साहित्यप्रकाराचा सोळाव्या शतकानंतरचा जो इतिहास आहे, तो गद्यातील निबंधासंबंधीचाच आहे.[]

पश्चिमी साहित्यात निबंध हा लेखनप्रकार सोळाव्या शतकाच्या शेवटीशेवटी उदयास आला. त्याचा जनक मॉंतेन (१५३३–९२) हा फ्रेंच लेखक मानला जातो.[] रॉबर्ट बर्टन (१५७७-१६४०) आणि सर थॉमस ब्राऊन(१६०२-१६८२) हे इंग्रजी भाषेतील उल्लेखनीय निबंधकार मानले जातात. इ.स. १७०० आणि १८०० मध्ये एडमंड बर्क आणि सॅम्युअल टेलर कोलरिज यांनी सर्वसामान्य लोकांसाठी निबंध लिहिले. विसाव्या शतकात अनेक निबंधकारांनी कला आणि संस्कृतीतील नवीन प्रवाह उलगडून सांगण्यासाठी निबंध लिहिले (उदा. टी. एस. एलियट).

मराठीतील निबंधांचा इतिहास

संपादन

मराठीमध्ये निबंधलेखनाची सुरुवात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीपासून झाली. बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, दादोबा पांडुरंग, स. म. दीक्षित, भारकर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबा पदमनजी, जोतीराव फुले, विष्णू परशुरामशास्त्री पंडित हे या पिढीतील काही निबंधकार होत. मराठी निबंधवाङ्‌मयाची मांडणी प्रथम मुख्यत: मराठी नियतकालिकांत सुरू झाली[]. १८३२ साली जांभेकरांनी 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. यातून त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल विचार मांडण्यासाठी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी अनेक लेख लिहिले. १८४१ साली भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' हे साप्ताहिक काढले. लोकहितवादींची गाजलेली शतपत्रे ही याच साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीमध्ये वेगवेगळी नियतकालिके सुरू झाली. या नियतकालिकांमधील लेख, स्फुटे, बातम्या आणि वाचकांची पत्रे, यांमधून मराठीत निबंध या लेखनप्रकाराची पायाभरणी झाली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधांचा वापर जनजागृतीसाठी केला गेला.

मराठी निबंध पाच टप्प्यांतून प्रकटत गेला आहे: (१) १८७०पूर्वीचा प्राथमिक निबंध, (२) चिपळूणकरी वळणाचा निबंध, (३) परांजपे वळणेाचा ललितगुणयुक्त निबंध (४) केळकरी वळणाचा प्रसन्न शैलीचा ललितगुणयुक्त निबंध आणि (५) लघुनिबंध.

शिवराम महादेव परांजपे यांनी 'काळ' वृत्तपत्रातून वाचकांसाठी असंख्य निबंध लिहिले; त्यांतले फक्त काही निवडक निबंध 'काळातील निवडक निबंध' या दहा खंडी ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही निबंध लेखन महत्त्वपूर्ण आहेत. मूकनायक, बहिष्कृत भारत यासारख्या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केले आहे.

ना.सी. फडके आणि अनंत काणेकर यांनी 'लघुनिबंध' हा नवीनच प्रकार मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय केला. ना,सी. फडके यांचे धूम्रवलये, गुजगोष्टी, नव्या गुजगोष्टी, निबंध सुगंध, आदी, आणि अनंत काणेकरांचे उघड्या खिडक्या, तुटलेले तारे, पिकली पाने, शिंपले आणि मोती आदी लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.

विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा निबंधमाला हा अनेक-खंडी ग्रंथ आहे

श्री.कृ. कोल्हटकर यांनी मराठीत विनोदी निबंधांची सुरुवात केली. त्यांचे 'सुदाम्याचे पोहे' प्रसिद्ध आहे.

आनंद यादव यांनी 'मराठी लघुनिबंधाचा इतिहास' नावाचा ग्रंथ लिहिला आहे.

अध्यापनाचे साधन

संपादन
 
विद्यापीठाच्या वाचनालयात शोधलेखन कराणाऱ्या या विद्यार्थ्यांप्रमाणे, are often assigned essays as a way to get them to synthesize what they have read.
  • अध्यापनाचे साधन (As a pedagogical tool)

औपचारिक शिक्षण पद्धतीत निबंध हे एक महत्त्वाचे साधन बनले.माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांची लेखनशैली सुधारावी यासठी त्यांना साचेबद्ध पद्धतीचे निबंध लेखन करायला शिकविले जाते.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात भाषेचे आकलन आणि प्रभुत्व पाहण्यासाठी निबंधाचा वापर केला जातो.निबंधाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना स्पष्टीकरण, टीका या पद्धतीने एकाद्या विषयावर मत नोंदविण्यास सांगितले जाते. अभ्यासक्रमात विशेषत विद्यापीठीय विद्यार्थ्यांना दीर्घ निबंध लिहायला सांगितले जातात ज्यासाठी काही महिने वा आठवडे तयारी करावी लागते.या जोडीने मानवहितवाद आणि सामाजिक शास्त्रे यांच्या अभ्यासक्रमाच्या सहामाहीत अथवा वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्याना दोन ते तीन तास बसून एखादा निबंध लिहावा लागतो. साहित्यिक अंगाने लिहिल्या जाणा-या निबंधांपेक्षा अभ्यासावर अथवा संशोधनावर आधारित 'शोधनिबंधाचे' स्वरूप वेगळे असते.यामध्ये लेखकाला स्वतःची मते नोंदविता येतात तथापि ती प्रथम पुरुषी असू नयेत आणि त्याला संबंधित संदर्भांची जोड देऊन तर्कपद्धतीने त्यांची मांडणी केली जाते.क्रमिक दीर्घ निबंध (ज्यांची शब्दमर्यादा २००० ते ३००० इतकी असते ते बरेचदा विषयांतर करणारे ठरू शकतात.अशा निबंधात काही वेळा प्रारंभी ' त्या विशिष्ट विषयावर पूर्वी झालेल्या अभ्यासाचा आढावा ' सारांशरूपाने नोंदवलेला असतो. दीर्घ निबंधात बऱ्याच वेळा प्रस्तावनेचे एखादे पोान असते. त्यात निबंधाच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण आणि संकल्पना नेमकेपणाने नोंदविलेल्या असतात. निबंधाचा विषय मांडताना पुरावा म्हणून जी उद्धरणे, साधने, संदर्भ मांडलेले असतील ते निबंधाच्या शेवटी 'संदर्भ ग्रंथ सूची ' किंवा 'संदर्भ सूची'या सदराखाली नोंदविले जावेत, असा बहुतेक सर्व शैक्षणिक संस्थांचवा आग्रह असतो. यामुळे एखाद्या अभ्यासपूर्ण निबंधाची सत्यता पटणे, त्यातील मुद्द्यांची शहानिशा करणे सोपे जाते. शिवाय त्या निबंधाचा वापर जे शिक्षक किंवा अभ्यासक करतात त्यांना त्या निबंधातील विचारामागील मूळ संदर्भ समजणे सोपे जाते व त्याआधारे त्या विचाराचे वा संकल्पनेचे मूल्यमापन पद्धतशीरपणे करणेही सोपे जाते.अशा प्रकारच्या अभ्यासाधीष्ठित निबंधामुळे विद्यार्थ्यांना त्यांची विचारप्रक्रिया त्यांना पद्धतशीरपणे मांडता येते का हे पाहिले जाते तसेच त्याच्या बौद्धिक क्षमतेचीही कल्पना येते.

एका विद्यापीठीय प्रबंध मार्गदर्शकाने शोध निबंध आणि चर्चात्मक निबंध असा भेद नोंदविला आहे. शोध निबंधात संबंधित विषयाच्या बाबतीत आवश्यक अशा विषयाची व्याप्ती वैविध्यपूर्ण असू शकते.त्याची लांबी मोठी असू शकते आणि संबंधित विषयाची भरपूर माहिती त्यात समाविष्ट असू शकते. चर्चात्मक निबंधता मात्र अधिक नेमकेपणा असतो आणि त्यात संशोधनही असते, पण तो निबंध अधिक तार्किक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. विद्यापीठाच्या कामात येणारी एक समस्या म्हणजे बरेचसे विद्यार्थी स्वतःकाम करण्याऐवजी काही लोकांकडून असे निबंध विकत घेतात.अशा प्रकारची फसवणूक किंवा वाङमय चौर्य अपेक्षित नसल्याने अशा संशयास्पद निबंधांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर संगणक प्रणाली आधारे हे काम तपासून घ्यावे लागते.

प्रकार, पद्धती आणि शैली

संपादन
 
Bastiat'चा एसे ऑन पॉलीटीकल इकॉनॉमी

विद्यार्थी, अभ्यासक, व्यावसायिक निबंधकार त्यांच्या निबंध लेखनासाठी प्रकार, पद्धती, शैली आणि प्रारूपांचा वापर करत असतात.

वर्णनात्मक निबंध

संपादन

वर्णनात्मक वर्णनात्मक निबंधात प्रामुख्याने वाचकाच्या शारीरिक, भावनिक,आणि बौद्धिक क्षमतांचा व संवेदनांचा विचार केलेला असतो. अशा वर्णनात लेखनाचा हेतू,वाचकांचा विचार, मुद्दा प्रभावीपणे मांडणे, ओघवती व वर्णनात्मक भाषा वापरणे अपेक्षित असतो. वर्णन हे साचेबद्ध असावे लागते पण ते काही वेळा पसरटही होऊ शकते. अशा वर्णनात भाव हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. भाषा, उपमा इ. सारखे भाषिक अलंकार यांचा वापर करून वर्णन अधिक आशयघन केले जाते.

सण / उत्सव निबंध

संपादन

सण / उत्सव निबंध या प्रकारच्या निबंधात प्रामुख्याने भारतात साजरे केलेल्या निरनिराळ्या सणांवर लिहले जातात जसे कि दिवाळी, गेणेश उत्सव ई.

वृतांतपर

संपादन

वृतांतपर निबंधात भूतकाळात घडलेल्या घटना, स्थित्यंतरे यांचा पाया मजबूत असावा लागतो ज्यामुळे कायम उत्कंठा वाढीला लागते. अशा निबंधाचा मुख्य गाभा म्हणजे त्याचे कथानक. असे कथानक रचताना लेखकाला नेहमी वाचकवर्ग, हेतू, संवाद याचा पूर्ण विचार करावा लागतो.अशा कथानकात घटनाक्रम हा कायम ठेवावा लागतो..

सोदाहरण आणि दृष्टांतयुक्त

संपादन

अशा निबंधात सार्वत्रिकीकरण, प्रातिनिधिकता आणि पटतील अशी योग्य उदाहरणे, पूर्वेतिहास इ. नोंदवावी लागतात. लेखकाने वाचकांचा दृष्टिकोन, हेतू , महत्त्व, चपखल उदाहरणे आणि या सर्वांचे एकत्र व योग्य समायोजन याचा अपूर्ण विचार करावा लागतो.

तुलना आणि विरोधाभास

संपादन

अशा निबंधात तुलना, विरोध आणि साम्य या मुद्द्यांचा विचार करावा लागतो.तुलनेमध्ये दोन समान गोष्टींमधील विचार असतो तर विरोधात त्या दोन गोष्टीमधील फरक सांगितला जातो.अशा निबंधात लेखकाला तुलना व फरक आणि साम्याचे मुद्दे , वाचकाची मानसिकता,हेतू अशा सर्व गोष्टींचा विचार करून एकत्रित निष्कर्ष मांडावा लागतो.

कारण आणि परिणाम

संपादन

या प्रकारच्या निबंधात घटनेचा साखळीक्रम, कालक्रम ,सावध भाषा आणि जोरकस मांडणी असावी लागते.अशी पद्धत वापरताना लेखकाला विषय, हेतू, मांडणी , भाषा परिणामांचे पडसाद वा कारणे, दुवे जोडणे अशा पद्धतीने विचार करत निष्कर्ष मांडावा लागतो.

श्रेणीकरण आणि वर्गीकरण

संपादन

वर्गीकरण म्हणजे मोठ्या विषयांचे उपविभाग मांडणे तर श्रेणीकरण म्हणजे असे मोठे विषय लहान उपविषयांत नोंदविणे.

व्याख्या निबंध

संपादन

'व्याख्या निबंध एखाद्या वस्तुनिष्ठ अथवा काल्पनिक संज्ञेचा अर्थ विशद करतात.'[]


युक्तिवाद शास्त्र

संपादन

अशा निबंधात तात्त्विक आणि तार्किक मांडणी अपेक्षित असते ज्यामध्ये वाद-प्रतिवाद अशी निबंधाची रचना केलेली दिसते.एखाद्या मुद्द्याला विरोध करताना व्यापक विचार करण्याचे स्वीकारशीलता यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे समान विचारधारा मांडणे सुलभ जाते.

इतर तर्कपूर्ण

संपादन

अशा पद्धतीच्या तर्कपूर्ण मांडणीने निबंधाचे कोणतेही स्वरूप आकार घेऊ शकते.विचार प्रक्रिया काय पद्धतीने मांडली गेली आहे हे समजल्यावर व्यक्त करण्याची क्षमता आणि एकूणच परिणामकारकता लक्षात घेता येते. अशा निबंधांचे स्वरूप सोपे करण्यासाठी त्यामध्ये आकृती, तार्किक स्पष्टीकरण यांचा समावेश होतो. त्यामुळे ठाशीव पद्धतीने हा निबंध सादर करता येतो व मुद्द्यांची सत्यासत्यता स्वीकारता येते.

वृत्तपत्रीय आणि नियतकालिकीय

संपादन
 
'हार्पर्स' या निबंध विषयक मासिकाच्या इ.स. १८९५ मधील आवृत्तीच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र.

वृत्तपत्रीय आणि नियतकालिकीय निबंधांचे स्वरूप सहसा वैचारिक स्वरूपाचे असते. वृत्तपत्रांच्या संपादकीय, संपादकीय पानावरील अथवा साप्ताहिक पुरवणीतील स्तंभलेखांत बऱ्याचदा वैचारिक अथवा माहितीपूर्ण निबंधांचा समावेश केला जातो . साप्ताहिक पुरवण्यांत आणि नियतकालिकांत ललित निबंध हा प्रकारही वापरला जातो.

कारकीर्द निबंध

संपादन

एखाद्या विशीष्ट कामासाठी एखादी विशिष्ट व्यक्ती निवडताना, व्यक्तीची पात्रता ज्ञान, कौशल्य, आणि क्षमता या कसोट्यांवर पडताळण्याच्या दृष्टीने संबंधित उमेदवारास त्यांच्या अनुभव आणि निवड झाल्यास तो काय आणि कशा प्रकारे काम निभावू शकेल (इच्छितोतात) या संबंधाने कारकीर्द निबंध (Employment essays) लिहिण्यास सांगितले जाऊ शकते. काही विशीष्ट क्षेत्रात क्वचीत शासकीय आणि एनजीओ इत्यादी क्षेत्रात नौकरीच्या अर्जासोबत कारकीर्द निबंध द्यावा लागू शकतो.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

संपादन

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या संघ सरकारच्या रिक्त पदांसाठी अर्ज करताना 'के.एस.ए' (ज्ञान, कौशल्य, आणि क्षमता) आणि ECQs (Executive Core Qualifications- आंतरिक कार्यकारी पात्रता) लिहावे लागतात

'के.एस.ए' , मध्ये आपल्या बायो डाटा सोबत, आपल्या ज्ञान, कौशल्य, आणि क्षमतांची योग्यता आणि आपल्या शैक्षणिक आणि कारकिर्दीची पार्श्वभूमी, संक्षीप्त आणि विषय-अनुलक्षीत series of narrative statements [मराठी शब्द सुचवा] निबंधाच्या माध्यमातून मांडावी लागते.

'ई.सी.क्यु.' (Executive Core Qualifications- आंतरिक कार्यकारी पात्रता) निबंध अधिक वरीष्ठ स्तरीय पदांसाठीच्या अर्जा सोबत लिहावे लागतात.

वाङमयेतर प्रकार

संपादन

दृष्य कला

संपादन

दृष्यकलांमध्ये मुख्य चित्रण अथवा मुर्ती घडवण्यापुर्वी काढलेल्या प्राथमिक चित्र किंवा स्केचला "essay" असे म्हणतात.


संगीत

संपादन

संगीतविषयक निबंधांत संगीतरचना आणि संगीत मजकुराच्या संबंधाने मांडणी केली जाते. सॅम्युएल बार्बर यांचे "एसेज फॉर ऑर्केस्ट्रा" संगीत निबंध प्रकारात मोडते.


चित्रपट निबंध

संपादन
प्राणिसंग्रहालयास भेट - मेंढपाळ आठवडा (हेग)

चित्रपट निबंध ("cinematic essays") एखाद्या प्लॉटच्या एवजी एखादी कल्पना किंवा एखादी विषयवस्तू (theme) उलगडत नेतात, अथवा एखाद्या निवेदकाने केलेल्या निबंध वाचनाला दिलेली लघुपट फितीची जणू सोबतच असते. वेगळ्या शब्दात, चित्रपट निबंधाची व्याख्या माहितीपटाच्या दृष्यास स्व-चित्रणाचे घटक असलेले भाष्य रूपाची (पण आत्मचरित्र नव्हे) जी जोड दिलेली असते, तिच्यात चित्रपट निर्मात्याची शैली (पण जीवनकथा नव्हे) प्रतिबिंबित होते. चित्रपट निबंध निर्मिती बहुतेक वेळा माहितीपट, fiction, आणि प्रायोगिक चित्रपट निर्मितीच्या छटा आणि संपादन शैली वापरून केलेली असते.[] या निबंध प्रकाराची निश्चित व्याख्या केली गेली नसली तरीही, Dziga Vertov सारखे सोव्हिएट लघुपट, सद्यकालीन चित्र्पट निर्माते जसे की Chris Marker, Agnes Varda, Michael Moore (Roger and Me, Bowling for Columbine आणि Fahrenheit 9/11), Errol Morris (The Thin Blue Line), किंवा Morgan Spurlock (Supersize Me: A Film of Epic Proportions). Jean-Luc Godard सारखे सद्यकालीन चित्रपट निर्माते त्याच्या अलिकडील कामास "चित्रपट-निबंध" असे म्हणतात.[]

George Melies आणि Bertolt Brecht या दोन चित्रपट निर्मात्यांचे कामाकडे चित्रपट निबंधांच्या पूर्वाश्रमीचे काम म्हणून निर्देश करता येतो. George Melies ने इस्वी १९०२ मध्ये Edward VIIच्या राज्याभिषेकावर माहितीपट बनवला होता ज्यात प्रसंग उभाकरण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष फुटेज वापरले होते. Bertolt Brecht या नाटककाराने त्याच्या नाटकातून विशीष्ट पद्धतीने चित्रपट अंश वापरण्याचे प्रयोग केले.[]

डेव्हीड विंक्स ग्रे त्यांच्या "The essay film in action" लेखात म्हणतात "चित्रपट निबंध १९५० आणि ६० च्या दशकात (लघू)चित्रपट निर्मितीचा एक प्रकार म्हणून परिचीत झाले होते". ते म्हणतात, तेव्हा पासून चित्रपट निबंध चित्रपट 'निर्मितीक्षेत्राच्या परिघावर' आहेत. चित्रपट निबंढांना "एक वैशिष्ट्यपूर्ण शोध, आणि प्रश्नांची छटा असते" जी " डॉक्यूमेंटरी आणि कथा" या दोन्हीत कुठेतरी कोणत्याही एका गटात सहजतेने बसत नाही. 'ग्रे'च्या मतानुसार, चित्रपट निबंधसुद्धा अगदी लिखीत निबंधाप्रमाणे मार्गदर्शक निवेदकाचा (बहुतेक वेळा दिग्दर्शकाचा) आवाज अन्य व्यापक मांडणीत बेमालूम मिसळून सादरीकरण करतात. [१०] विस्कॉन्सिन विद्यापीठाची सिनेमॅटिक वेबसाईट 'ग्रे'प्रमाणेच काही मते व्यक्त करते. या वेबसाईटनुसार चित्रपट निबंध म्हणजे अशी "संकेतयुक्त आणि जिव्हाळ्याची" शैली जी " काल्पनिक चित्रपट आणि माहितीपटांच्या सीमारेषेवर "कल्पक, आनंदी खेळकर, आणि विलक्षण" उत्साहवर्धक पद्धतीने व्यक्त होणारी चित्रपट निर्मात्याच्या चिंताग्रस्त मनाची भावना पकडते.[११]

 
" फ्रेंच पोलेनिशियाच्या एका बीचवर शाळासुटल्यावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ, कुणीतरी पकडलेला आणि वापस पाण्यात सोडलेला स्टिंगरे (वाघोळे) मासा पाहण्यासाठी थांबतो आणि पुन्हा सुरू होतो; ते क्षण, स्कॉट विल्यम नावाच्या छायाचित्रकाराने ह्या एक सोप्या छायाचित्र निबंधाद्वारे टिपले आहेत

विशिष्ट क्रमाशिवायसुद्धा असू शकतात. सर्व छायाचित्र निबंधांना हे छायाचित्र संग्रह म्हणता येते पण सर्व छायाचित्र संग्रहांना छायाचित्र निबंध म्हणता येत नाही छायाचित्र निबंध बऱ्याच वेळा विशिष्ट विषय, प्रसंग अथवा स्थळांचे वर्णन करतात.

हे सुद्धा पाहा

संपादन

अधिक वाचन

संपादन
  • Theodor W. Adorno, The Essay as Form in: Theodor W. Adorno, The Adorno Reader, Blackwell Publishers 2000.
  • Beaujour, Michel. Miroirs d'encre: Rhétorique de l'autoportrait'. Paris: Seuil, 1980. [Poetics of the Literary Self-Portrait. Trans. Yara Milos. New York: NYU Press, 1991].
  • Bensmaïa, Reda. The Barthes Effect: The Essay as Reflective Text. Trans. Pat Fedkiew. Minneapolis: Univ. of Minnesota Press, 1987.
  • D'Agata, John (Editor), The Lost Origins of the Essay. St Paul: Graywolf Press, 2009.
  • Giamatti, Louis. “The Cinematic Essay”, in Godard and the Others: Essays in Cinematic Form. London, Tantivy Press, 1975.
  • Lopate, Phillip. “In Search of the Centaur: The Essay-Film”, in Beyond Document: Essays on Nonfiction Film. Edited by Charles Warren, Wesleyan University Press, 1998. pages 243-270.
  • Warburton, Nigel. The basics of essay writing. Routledge, 2006. ISBN 041524000X, ISBN 9780415240000

बाह्य दुवे

संपादन

साचा:Wikibooks

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d e f g h i रावसाहेब गणपतराव जाधव यांचे. "निबंध". मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ [दिलीप]. "शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे". # निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद). ऑक्टोबर ६ २०१४ रोजी पाहिले. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); Check |लेखकदुवा= value (सहाय्य); Check |लेखकदुवा= value (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4884359818277868638?BookName=Nibandharachana-Tantra-aani-मंत्र
  4. ^ http://www.gale.cengage.com/free_resources/glossary/glossary_de.htm
  5. ^ a b Collected Essays, "Preface"
  6. ^ a b मराठी विश्वकोश खंड १२, पान ३४ "मराठी साहित्य"
  7. ^ Chapter 9: Definition Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
  8. ^ a b http://www.chicagomediaworks.com/2instructworks/3editing_doc/3editing_docinematicessay.html
  9. ^ Discussion of film essays
  10. ^ http://www.sf360.org/features/the-essay-film-in-action
  11. ^ http://cinema.wisc.edu/series/2009_spring/essay.htm
  NODES
Done 1