फोषान
चीनमधील एक शहर
फोषान (देवनागरी लेखनभेद : फोशान) हे चीन देशाच्या आग्नेय भागातील क्वांगतोंग ह्या प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मोती नदी खोऱ्याच्या पश्चिम भागात क्वांगचौच्या वायव्येस वसले असून ते क्वांगतोंग-षेंचेन महानगर क्षेत्राचा भाग मानले जाते. २०२० साली फोषान शहराची लोकसंख्या सुमारे ९५ लाख होती. फोषान येथे पारंपारिक मँडेरिन भाषेसोबत कॅंटोनीज भाषा देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
फोषान 佛山市 |
|
चीनमधील शहर | |
फोषान शहर क्षेत्राचे क्वांगतोंग प्रांतातील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | क्वांगतोंग |
स्थापना वर्ष | इ.स. ३३१ |
क्षेत्रफळ | ३,८४८ चौ. किमी (१,४८६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५२ फूट (१६ मी) |
लोकसंख्या (२०२०) | |
- शहर | ९४,९८,९०० |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://foshan.gov.cn/ |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
विकिव्हॉयेज वरील फोषान पर्यटन गाईड (इंग्रजी)