मलागा
विकिपीडिया वर्ग
मलागा हे स्पेनच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (सेबियाखालोखाल) आहे. ५,६८,५०७ इतकी लोकसंख्या असलेले मलागा स्पेन्मधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या १०० किमी पूर्वेस व आफ्रिकेच्या १३० किमी उत्तरेस भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले मलागा हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक व युरोपातील सर्वात दक्षिणेकडील मोठे शहर आहे.
मलागा Málaga |
|||
स्पेनमधील शहर | |||
| |||
देश | स्पेन | ||
राज्य | आंदालुसिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ७७० | ||
क्षेत्रफळ | ३९५ चौ. किमी (१५३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ५,६८,५०७ | ||
- घनता | ३७९.९ /चौ. किमी (९८४ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० | ||
www.malaga.eu |
युरोपातील सर्वात उबदार हिवाळे अनुभवणारे मलागा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे व पर्यटन हा येथील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे.
विख्यात चित्रकार व कलाकार पाब्लो पिकासो ह्याचा जन्म ह्याच शहरात झाला.
चित्र दालन
संपादन-
रोमन थिएटर
-
समुद्रकिनारा
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2011-02-03 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील मलागा पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |