सावा नदी
मध्य युरोपमधील नदी
साव्हा (सर्बो-क्रोएशियन: Sava) ही युरोपाच्या बाल्कन भागातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया व इटली देशांच्या सीमेजवळील क्रान्यास्का गोरा ह्या स्लोव्हेनियामधील एका गावामध्ये उगम पावते. तेथून साधारणपणे पूर्व दिशेस क्रोएशिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना व सर्बिया देशांमधून ९९० किमी अंतर वाहून साव्हा बेलग्रेड शहरामध्ये डॅन्यूब नदीला मिळते. साव्हा ही युरोपातील २१व्या क्रमांकाच्या लांबीची नदी व डॅन्यूबची सर्वात मोठी उपनदी आहे.
साव्हा नदी | |
---|---|
बेलग्रेड शहराच्या मध्यातून वाहणारी साव्हा | |
सावा नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | क्रान्यास्का गोरा, स्लोव्हेनिया |
मुख | डॅन्यूब नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
स्लोव्हेनिया क्रोएशिया बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सर्बिया |
लांबी | ९९० किमी (६२० मैल) |
उगम स्थान उंची | ८३३ मी (२,७३३ फूट) |
सरासरी प्रवाह | ९९० घन मी/से (३५,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ९७,७१३ |
लियुब्लियाना, झाग्रेब व बेलग्रेड ही तीन प्रमुख शहरे साव्हा नदीच्या काठांवर वसली आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत